काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात; दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता

blank

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी आता बाळासाहेब थोरातांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी राजीनामा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. तसेच नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, बसवराज पाटील यांची कार्याध्यक्ष पदी नेमणूक होणार असल्याचीही माहिती आहे. यासंबंधीची घोषणा दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून कॉंग्रेस राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलेले दिसत आहे. तसेच कर्नाटकमधील राजीनामा नाट्यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या त्यामुळेच आता या नियुक्त्या होणार आहेत.