युवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस पक्षाच्या वाटचालीत युवक काँग्रेसचाही मोठा वाटा असून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रद्धा,सबुरी व सातत्य ठेवून काम करावे असे आवाहन करुन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने केलेल्या कामाचे कौतुक केले.

टिळक भवन येथे आज युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हरपालसिंग, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमित झनक, युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आ. माणिकराव जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त शिवराज मोरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Loading...

या बैठकीला मार्गदर्शन करताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी युवक काँग्रेसने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासमोर कठीण परिस्थिती असताना युवक काँग्रेसने सुपर ६० उपक्रम राबवून ६० मतदारसंघात नियोजनबद्ध काम केले याचा फायदा झाल्याचे ते म्हणाले. यापुढेही मतदारसंघ बांधणीच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक गावात संघटना पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी गाव तिथे युवक काँग्रेस, झाली पाहिजे त्यासाठी काम करा. सातत्याने संघटनेसाठी योगदान देण्याची गरज आहे. तुमच्यातून उद्याचे नेतृत्व उदयास येणार आहे, असे थोरात म्हणाले.

काँग्रेसला एक विचार आहे, इतिहास आहे, परंपरा आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणार आहे. त्यामुळे काँग्रेस विचार तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी कार्यशाळांची गरज आहे. जातीधर्मात फूट पाडणारा भाजपाचा विचार घातक असून पुरोगामी विचार पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी काम करा, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'