काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरातांची वर्णी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनतर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली आहे. अशोक चव्हाण यांनाही पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले असा प्रश्न उपस्थित झाला होता. इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती याचदरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर काँगेसने विखे यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.