संभाजीराजेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना मी केली होती – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : राज्यसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याबाबदचा शब्द पाळला नाही, असं विधान संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबद व शिवसेनेच्या भूमिकेवर  आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना मी केली होती. संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकासआघाडी सकारात्मक होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या गोठ्यात असल्यामुळे तो निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही आमची अतिरिक्त मदत महाविकास आघाडीचा उमेदवाराला देण्याचं ठरवलं आहे. असं असलं तरी संभाजी राजांना उज्वल भविष्य असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –