कॉंग्रेसमध्ये मोठे बदल प्रदेशाध्यक्ष थोरात तातडीने दिल्लीला रवाना

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र कॉंग्रेस आता चांगलीच कामाला लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब थोरात , प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व सर्व नवनियुक्त कार्याध्यक्ष ह्यांच्या उपस्थितीमध्ये दि.18 जुलै रोजी मुंबई येथे राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीत होणाऱ्या वाटाघाताबाबतीत चर्चा होणार असून आगामी निवडणुकीची रणनीती देखील ठरणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

या भेटीत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवातून काँग्रेसने चांगलाच धडा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल करण्यात आला. त्यामुळे आता इतरही पदांवर तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये नक्की कोणते बदल करण्यात येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसने अखेर पक्ष संघटनेवर लक्ष दिल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली बाळासाहेब थोरात यांची निवड त्याचेच संकेत देत आहेत. प्रदेश कॉंग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली असल्याने सामूहिक नेतृत्वावर भर देण्याचा पक्षाचा प्रयत्नही दिसतो आणि सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याचा कलही लक्षात येतो.

तर थोरात यांच्या या निवडीचा आणखी एक पदर आहे, कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आणि 4 वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद पटकावल्याने त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करून कॉंग्रेसने पक्षनिष्ठेचा सन्मान केला आहे. त्याचबरोबर थोरात यांच्यावर मोठी जबाबदारीही टाकली आहे. विखे पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेसमधील आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान केले होते. आता राज्यातील पक्षाची धुरा स्वीकारल्यानंतर पक्षातील हे आउटगोइंग थांबवण्याचे मोठे आव्हान थोरात यांना पेलावे लागणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले