मोदी सरकार हेच देशावरील सगळ्यात मोठा बोजा : बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर देशावरील कर्जात सातत्याने वाढ होत आहे.सध्या देशावरील कर्जामध्ये ७१ टक्क्यांची वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्ते गौतम वल्लभ यांनी केला होता.यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर मोदी सरकार हाच सगळ्यात मोठा बोजा आहे अशी टीका केली आहे.

गेल्या साडे पाच वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा ७१ टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप काँग्रेसेचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला होता. तसेच हा बोजा उतरवणार कसा, असा सवालही त्यांनी केला होता.

Loading...

मार्च २०१४ मध्ये एकूण कर्ज ५३.११ लाख कोटी रुपये होते, ते सप्टेंबर २०१९ मध्ये ९१.०१ लाख कोटी रुपयांवर गेले. कर्जात ३७.९ लाख कोटींची वाढ (७१.३६ टक्के) झाली. म्हणजेच प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ४१,२०० रुपयांवरून ६८,४०० रुपयांवर गेले. कर्ज प्रति माणशी २७,२०० रुपयांनी वाढले. साडेपाच वर्षांमध्ये प्रति माणशी कर्जाचे प्रमाण ६६ टक्के म्हणजे दरवर्षी १०.३ टक्क्य़ांनी वाढले.

यावर बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षात देश दिवाळखोरीत काढला आहे. या सरकारला कुठलेही धोरण वा दिशा नसल्यामुळे आर्थिक आणीबाणी ओढवली आहे. त्यातूनच कर्जाचा बोजा वाढला आहे. खरे म्हणायचे तर मोदी सरकारच देशावरचा सर्वात मोठा बोजा आहे, अशी टीका खुमासदार टीका थोरात यांनी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...