केंद्र सरकारकडून मुलभूत हक्कांवर घाला घालण्याचे काम सुरु आहे, बाळासाहेब थोरातांचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : ‘केंद्रातील सरकारकडून मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. फोन टॉपिंग हा त्यातलाच एक प्रकार आहे. अशा प्रकरच्या कारभारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे,’ अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सरकारने शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील काही नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती समोर येताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्यासह शिवसेना खासदार यांनीदेखील त्यांचे फोन कॉल्स टॅप केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ”फोन टॅपिंग ही विकृती आहे, असा घणाघात भाजपवर केला आहे.

Loading...

आव्हाड यांच्यानंतर पुण्यात एका कार्यक्रमासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, ‘ केंद्रातील सरकारचे गेल्या पाच वर्षातील काम पाहिले, तर लोकशाहीवर घाला घालण्याचे काम सुरु आहे. त्याचाच हा एक भाग आहे. लोकशाही मानणारे आणि जपणारे आपण सर्वंजण आहेत. व्यतिगत स्वतंत्र संकुचित करण्याचे काम सुरु आहे. यावरून लोकशाही धोक्यात येईल का अशी भिती वाटते आहे.

तसेच यावेळी त्यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सुरक्षा काढण्याबाबत विचारले असता थोरात म्हणाले की, पवार हे देश पातळीवरील नेते आहेत. त्यांना जपणे हे सरकारचे काम आहे. अशा प्रकारे त्यांची सुरक्षा काढून घेणे योग्य नाही. राज ठाकरे यांच्या बदल बोलताना थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ठाकरे यांनी जी भाषणे केली. ती लोकशाही बळकट करणारी होती. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात