‘संघ स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रचार, प्रसार करत आहेत’

मुंबई : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापनविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटने पत्रकारीता विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या ”Knowing RSS” या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. पुरोगामित्वाचा ठेका घेतल्याचा आव आणणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी भुवया उंचावणारी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

यावर बोलताना थोरात म्हणाले की, भाजप सरकारच्या आशिर्वादाने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेले स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रचार, प्रसार करत आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठ निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी संघाचा स्वयंसेवक व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे थोरात म्हणाले.त्याचबरोबर यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. ते याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी थोरातांनी दिला.

Loading...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तविद्या विभागात एम.जे.एम.सी. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना ‘वर्ल्ड व्हिव’ नावाचा एक विषय आहे.या विषया अंतर्गत भारत आणि महाराष्ट्रातील समकालीन राजकारण हे घटक शिकवले जातात.त्यात पक्षीय राजकारण ,दबाव गट, विचारसरणी अशा उप-घटकांचा समावेश होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा आणि आपला एका दबाव गट कायम ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेता येईल, असा तो विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा अंदाज होता.म्हणून त्यांनी ‘स्वेच्छेने’ ज्या विध्यार्थ्याला यायचे असेल त्याने यावे असे सांगून तो कार्यक्रम अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात लावला.सोबतच उद्या कुठल्याही दुसऱ्या विचारसरणीचा कार्यक्रम पुण्यात होणार असेल तर आपण तों कार्यक्रमही आपल्या वेळापत्रकात लावू असेही सांगितले.अशी माहिती विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र देशाला दिली.एन.एस.यु.आय. आणि इतर विद्यार्थी संघटनांनी ही कृती म्हणजे संघ विचार पसरवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला होता. विद्यार्थ्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांची सहमती घेऊनच याबाबतचे नियोजन करण्यात आले होते अशी माहिती दिली आहे.

पत्रकारितेचे शिक्षण देण्याची पद्धत हि इतर विभागांपेक्षा वेगळी असते. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजात असणाऱ्या अनेक विचारधारांचा अभ्यास करणे तसेच त्या समजावून घेणे गरजेचे असते. विशेष म्हणजे राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,विविध विचारधारा समजावून घेणे हा या विभागाच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे.विद्यापीठाने काही संघटनांचा विरोध लक्षात घेवून आपल्या शेड्युलमध्ये बदल देखील केला आहे. मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय लागलेल्या राजकारण्यांकडून या मुद्यावरून देखील राजकारण सुरु केले आहे.खरं तर मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने जबादारीने बोलणे अपेक्षित आहे मात्र थोरातांनी मांडलेली भूमिका चेष्टेचा विषय बनला आहे.

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...