विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते नव्हे तर ‘पक्ष विरोधी’ नेते – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते नव्हे तर ‘पक्ष विरोधी’ नेते असल्याची टीका अहमदनगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली आहे. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथील सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ही टीका केली आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखेंच्या भाजपप्रवेशामुळे नगरच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. एक उमदा युवानेता भाजपच्या गळाला लागल्याने कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आता उफाळून येण्याची शक्यता आहे. यातच विखे आणि थोरात यांच्यातील सुप्त लढाई राज्याने पाहिली असल्याने आता यामध्ये अजूनच वाढ होत आहे.