‘राज्यातले सरकार कोसळावे म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्यांचे स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत’

balasaheb thorat

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.

पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींनी संवाद साधला. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात असून १ तासाच्या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रातील चर्चेसोबतच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील वाढलेला तणाव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सातत्याची गैरसमज करणारी विधाने यामुळे सरकारबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

अशातच, राज्यासह केंद्रातील भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. तर, पवार-मोदी भेटीमुळे उत्सुकता अधिक वाढली आहे. या भेटीवर आता कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे आशा पल्लवित झाल्याने काही लोक राज्यातले सरकार कोसळावे, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. दिवसा स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत’, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या 

IMP