fbpx

सरकारच्या धोरणाला शेतकरी, शेतमजूर, चारा छावणीचे मालक वैतागले – थोरात

Enrichment of everyone's life due to education - Balasaheb Thorat

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भीषण दुष्काळात नागरिकांना पाण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. रोजगार हमी योजनेतून काम मिळत नाही. आघाडी सरकारच्या काळात पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांना आम्ही तत्काळ मदत केली. युती सरकार प्रत्येकबाबतीत अटी घालून खोडा घालण्याचे काम करीत असल्याने शेतकरी, शेतमजूर, चारा छावणीचे मालक वैतागले आहेत,” अशी टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

दरम्यान, दुष्काळी उपाययोजना करताना त्या वेगाने झाल्या पाहिजेत. सरकारने या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसे दिसत नाही, असे थोरात म्हणाले.