पूरपरिस्थितीचे सरकारला कसलेच गांभीर्य नाही, थोरातांचा घणाघात

Enrichment of everyone's life due to education - Balasaheb Thorat

टीम महाराष्ट्र देशा : गेले काही दिवसांपासून सातारा, सांगली, कोल्हापूरला महापूराने थैमान घातले असतानाही युतीचे सरकार विदर्भात जल्लोष करण्यात मग्न झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या संपूर्ण पूर परिस्थितीला युतीचे सरकारच जबाबदार असून याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

सन 2005-06 मध्येही अशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यापेक्षाही भीषण पूरस्थिती यावेळी निर्माण झाली होती. असे असतानाही सरकारला याचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत लोकांना मदतीची अपेक्षा असते. मात्र आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचविण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शनिवारी कराड येथील पूरपरिस्थितीची पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सुनील पाटील उपस्थित होते.

राज्यातल्या पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार – अजित पवार

कॉंग्रेसला भविष्यात चांगले दिवस येणार ; थोरातांनी व्यक्त केला विश्वास

कॉंग्रेसला बळ आणण्यासाठी बाळासाहेब थोरात घेणार विभागीय बैठका