कुमारस्वामींचं सरकार पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, कुमारस्वामींचं सरकार कोसळलं, यामुद्यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली, असा आरोप थोरात यांनी केला.
काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरलं असून, कुमारस्वामींचं सरकार कोसळलं आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी अपयशी ठरले. दरम्यान कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार कोसळल्यानंतर कॉंग्रेसने सरकारवर निशाणा साधला.

भाजपने काँग्रेस आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून व पंचतारांकीत हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली. ही लोकशाहीची गळचेपी असून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करून भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, असे थोरात यांनी म्हंटले.

Loading...

इतकेच नव्हे तर, भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे, असेही त्यांनी म्हंटले.

तसेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, असा आरोपही थोरात यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत