‘स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का?’, बाळासाहेब थोरात आक्रमक

‘स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का?’, बाळासाहेब थोरात आक्रमक

kangna-balasaheb

अहमदनगर : ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, अशी मुक्ताफळे बॉलिबूड अभिनेत्री कंगना रणौतने(Kangana Ranaut) एका कार्यक्रमात उधळली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधत असतांना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी कंगना तसेच अभिनेते विक्रम गोखलेंवर(Vikram Gokhle) टीका केली आहे.

यावेळी बोलत असतांना थोरात म्हणाले की,’कंगना रणौत काय बोलते? स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का? कंगनाचे बोलणे चुकीचे आहे. वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते. पद्मश्रीही मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहेत. त्यांनाही पद्मश्री मिळून जाईल’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कंगना काय आणि गोखले काय…हे दोघेही सहज बोलत नाहीत. यामागे कोणी तरी आहे. हे लोक आता देशाच्या राज्य घटनेकडेही वळतील. पण देश राज्यघटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या या घटनेत सर्व संतांच्या विचाराचे सार आहे. पण काही लोक आज स्वातंत्र्यावर शंका घेतात. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील.’

महत्वाच्या बातम्या: