हा तर पुरोगामी विचारवंतांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न

अहमदनगर : कोरेगाव भीमा प्रकरण आणि एल्गार परिषदेच्या तपासावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ‘दलित, आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा डाव असून, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे’. अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, पुरोगामी व्यासपीठ असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे, चौकशी करणे चुकीचं आहे. कोणाविरोधात पुरावे असतील तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचा खून झाला त्यामुळे पुरोगामी विचारवतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. NIA कडे तपास देण्याची वेळ पाहिली तर सगळा तपास संशयास्पद वाटत आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Loading...

थोरात पुढे म्हणाले, ‘ कोणी वेगळं वागलं असेल, काही पुरावा असेल तर त्याची बाजू आम्ही घेणार नाही. परंतु जे कवी होते, विचारवंत होते, त्यांनी पुरोगामी विचार मांडला. त्यांची चौकशी विचार करायला लावणारी आहे. दाभोळकरांना मारलं गेलं, कलबुर्गींना मारलं गेलं, पानसरेंची हत्या झाली. या पुरोगामी विचारवंतांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं. असंही वाटतं की जी पुरोगामी चळवळ, दलित, आंबेडकरवादी चळवळ आहे तिलाच नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव आहे का? हे सर्व काळजीचं वाटतं. एनआयएकडे तपास देणे, तिचा वेळ-काळ हे संपूर्ण पाहिलं, तर सगळा देश-समाज सर्वजण त्याकडे काळजीच्या स्वरुपाने पाहतोय, संशयाच्या स्वरुपाने पाहतोय, असं थोरात यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका