राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जातील असं वाटत नाही – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या तरी ते असे काही करतील असे वाटत नाही. त्यांनी नगर आणि शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे काम करावे, अशी अपेक्षा आहे. अस मत राधाकृष्ण विखेंचे कट्टर राजकीय शत्रू आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी नगरमधील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची भेट घेतली. पुत्र सुजय विखेंच्या संपर्क कार्यालयात ही भेट झाली. या भेटीमुळे विखेंनी पुत्र सुजय यांच्या प्रचाराला अधिकृतरीत्या सुरुवात केली आहे.

Loading...

या भेटीला भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यामध्ये अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह स्थानिक भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराचा आढावा घेतला. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे.

नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नगरमध्ये येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी झालेल्या भेटीमुळे राधाकृष्ण विखे शुक्रवारी होणाऱ्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार