आगामी निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार ?, बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान

balasahe thorat

अकोला : २०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर महाराष्ट्रात अभूतपर्व सत्तासंघर्ष पाहायला मिळाला आणि त्यातूनच भिन्न विचारसरणीच्या शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी तयार झाली. मात्र सत्तास्थापनेच्या अगदी काहीच दिवसांत आघाडीत खटके उडत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या त्या आज तागायत सुरूच आहेत. अशात येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हा आमचा उद्देश असून, त्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राज्यात आगामी सर्व निवडणुका सोबत लढणार असल्याचे मोठे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ‘भाजपला सत्तेबाहेर ठेवणे महाविकास आघाडीचा उद्देश असून, त्यासाठी आगामी सर्व निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढविणार आहेत. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे’. असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. ते अकोल्यात बोलत होते.

दरम्यान, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडीसोबत लढविणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या