मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बीकेसी येथे सुरू असलेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित दाखवली. यावेळी ते शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरेंनंतर आता जयदेव ठाकरेंनी शिंदे गटाची वाट धरली, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हे सगळं बरखास्त करा, निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या, असं भावनिक आवाहन जयदेव ठाकरेंनी यावेळी केलं.
नेमकं काय म्हणाले जयदेव ठाकरे?
ते म्हणाले हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा नेता आहे. त्यामुळे आता सर्व बरखास्त करून पुन्हा निवडणुका होवूद्या हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. ते आज मुंबईत एकनाथ शिंदे यांनी आयोजीत केलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होते.
एकनाथ माझा आवडीचा.. आता ते मुख्यमंत्री झालेत… म्हणून एकनाथराव म्हणतो, मला बरेच फोन येत होते, की तुम्ही शिंदे गटात गेलात का? पण हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंच्या दोन चार भूमिका मला आवडल्या. धडाडीचा माणूस आपल्याला हवाय, त्याच्या प्रेमासाठी आलोय, असं जयदेव ठाकरे म्हणाले.
तसेच मी म्हणून शिंदेंच्या प्रेमासाठी मी इथं आलो आहे. आपला एक इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ… त्यांना जवळच्यांनीच संपवलं. यांना एकटं पाडू नका. हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । मुख्यमंत्रीपद घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात
- Uddhav Thackeray | “मोहन भागवतांनी हिंदूत्व सोडलं की,…”; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांवर हल्ला
- Eknath Shinde | “त्याला हार्ट अटॅक आला असता” ; एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा
- Uddhav Thackeray । शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
- Eknath Shinde | “काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष…” ; एकनाथ शिंदे गरजले