राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र हात जोडले अन् शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला !

raj uddhav

मुंबई : मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अनावरण झालेआहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 14 महिन्यानंतर एकाच व्यासपीठावर आलेले या कार्यक्रमात पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमात हे दोन्ही बंधू पूर्णवेळ एकत्र होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर या दोघांनीही पुतळ्याचे छोटेछोटे बारकावे पाहिले. उद्धव ठाकरे यांनी राज यांना पुतळ्याबाबत काही माहिती दिल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. तर या कार्यक्रमावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र हात जोडत जनतेचे अभिवादन स्वीकारले. राज आणि उद्धव यांना अशा रीतीने एकत्र पहिल्याने जमलेल्या तमाम शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाल.

दरम्यान, या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावूक प्रतिक्रिया दिली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय, कायम लक्षात राहणारा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तर, या सोहळ्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी बडे नेते उपस्थित होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या