…अखेर बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा मालक ठरला

balasaheb thakare

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी दावा मागे घेतला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतली आहे.

Loading...

वाद नेमका काय होता?
उद्धवने बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव याच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते, असे त्यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितले होते.

या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...