मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जाने.)९६ वी जयंती. व्यंगचित्रकार ते राजकीय नेते असा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास आहे.दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे त्यांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. दरम्यान, सर्व राजकीय नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. ट्विटमध्ये अजित पवार म्हणाले आहेत की,’शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते.’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला.विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. pic.twitter.com/m6gyQYm5oM
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2022
दरम्यान, आदरणीय बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्वं, नेतृत्वं, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असेही पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- बाळासाहेबांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्य- संजय राऊत
- “ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
- Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
- सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
- “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप