Share

Balasaheb Sarate । रमेश केरे प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब सराटेंची प्रतिक्रिया!

Balasaheb Sarate | मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून पैसे घेतले असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

आत्महत्येच्या घटनेनंतर रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे (Asha Kere) यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. ज्यांनी-ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आशाताई केरे यांनी केली होती. दरम्यान विवेकानंद बाबर, अनिरुद्ध शेलार, योगेश केदार, संदीप पोळ, बाळासाहेब सराटे, विशाल पवार, नितीन कदम, प्रदीप कणसे यांच्यासह काही अज्ञात व्यक्तींविरोधात IPC 306, 500, 501, 511 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर आता ज्या आठ लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी बाळासाहेब सराटे यांनी आता याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. श्री. रमेश केरे यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्याची एक पोस्ट “OBC मधून आरक्षण” या ग्रुप वर पडलेली आहे. त्यात माझे नाव दिसत आहे. मी खरे तर या प्रकरणात लक्ष घालू इच्छित नाही. मला याबाबत मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही. पण मला पोलीस स्टेशन मधून फोन आला तर मग मात्र मला हे प्रकरण फार गांभीर्याने घ्यावे लागेल. कृपया समाज बांधवांनी याची दखल घ्यावी, असं सराटे म्हणाले.

याच रमेश केरे यांनी जाणून बुजून, संघटित पणे १६ मार्च २०१८ रोज संभाजीनगरच्या शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक ठिकाणी, सर्व लोकांसमोर माझ्यावर संघटित जीवघेणा हल्ला केला होता. मला मराठा सामाजात भांडण नको म्हणून मी तेव्हा पोलिसांची इच्छा व मीडियातील मित्रांचा आग्रह असूनही तक्रार केली नव्हती. त्या प्रसंगाचे व्हिडिओ you tube वर कोणीही पाहू शकतो. Google वर त्याच्या बातम्या वाचू शकतो. मराठा समाज बांधवांनी माझी भूमिका समजून घ्यावी, एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. तसेच बुक्क्यांनी मारहाण केली, माझ्या तोंडाला काळे फासले होते, असंही सराटे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Balasaheb Sarate | मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून विष प्राशन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now