‘माळी , धनगर, वंजारी यांंचं आरक्षण काढून काढा’

टीम महाराष्ट्र देशा : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या मराठा आरक्षणाचे बाळासाहेब सराटे यांनी आता माळी, धनगर आणि वंजारी समाजाचं आरक्षण काढा, अशी मागणी केली आहे.

बाळासाहेब सराटे यांनी याआधी इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणालाही विरोध करत, ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असून ते रद्द करावं, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात केली आहे. त्यावरील सुनावणी 4 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

“माधव (माळी, धनगर, वंजारी) फॉर्म्युला हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा आहे आणि त्यांनी 80 च्या दशकामध्ये या तीन जातींच्या नेतृत्त्वांना पुढे आणलं. त्यावेळी मराठा आरक्षण महाराष्ट्रात प्रस्थापित झालं होतं, त्याला शह देण्याचा प्रयत्न केला गेला. एक राजकीय खेळी म्हणून त्याला विरोध नाही. मात्र, मराठा समाजाच्या विरोधात ते जात असेल, तर ते आमच्या दृष्टीने चिंतेजी बाब ठरते.”, असे बाळासाहेब सराटे म्हणाले.

तसेच, “महाराष्ट्रातील गेल्या 25 वर्षातील राजकीय परिस्थिती पाहिली, तर भाजपने मराठा समाजाच्या समोर माळी, धनगर, वंजारी या जातींना झुकतं माप देऊन, ओबीसीतील मूळ भटके-विमुक्त आणि बलुतेदार-अलुतेदार आहे, त्यांच्यावरही खूप अन्याय केलेला आहे.”, अशी टीका सराटे यांनी सरकारवर केली.