VIDEO: माळी,धनगर,वंजाऱ्यांच्या नादाला लागू नका, सानपांचा सराटेंंना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली आहे. या मागणी नंतर आता ओबीसी नेतेदेखील आक्रमक झाले असून अतिशय तीव्र शब्दात जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सराटे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सराटे यांच्यावर शेलक्या शब्दात सानप यांनी टीका केली. तुम्ही तुमच्या आरक्षणाचं पहा माळी,धनगर,वंजारी यांच्या नादाला लागू नका असा थेट इशारा सानप यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी ओबीसींनी समर्थन दिलं याची आठवण देखील त्यांनी करून दिली तसेच आम्हाला आरक्षण स्व.गोपीनाथ मुंडेनी दिलं आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत हे देखील लक्षात घ्यावं असं त्यांनी म्हटलं आहे. यापुढे देखील माळी,धनगर,वंजारी याचं आरक्षण काढण्याची भूमिका तुम्ही घेणार असाल तर आम्हाला देखील पुढचा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला.

Loading...

दरम्यान,राज्याच्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक आणून, ते मंजूर केल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू करण्यात आला. मात्र, ओबीसी समाजाच्या काही मंडळींनी मराठा आरक्षणाला विरोध सुरु केला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.यानंतर ‘ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.’ , अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?