नेवासा पंचायत समिती सभापतींकडून लोकप्रतिनिधींचा हक्कभंग

 खुपटी- पुनतगाव रस्त्याचेे  लोकप्रतिनिधींना न सांगताच भूमिपूजन

भागवत दाभाडे -नेवासा ,अहमदनगर:जिल्हा परिषद अंतर्गत  नुकताच खुपटी येथे  झालेल्या खुपटी- पुनतगाव रस्त्याच्या भूमीपूजनाचे निमंत्रण  विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना न देता पंचायत समिती सभापती सुनिता गडाख यांच्या हस्ते करण्यात आले आहे.विशेष म्हणजे सदर कामास मंजुरी मिळण्यासाठी विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शिफारस पत्र दिले होते तसेच पाठपुरावा देखील केला होता .मात्र  या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती सभापती सुनीताताई गडाख  यांनी केले.  भूमिपूजन करताना तालुक्याचे प्रतिनिधी यानात्याने  विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना कळविणे आवश्यक होते त्यामुळे आता मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून  हक्कभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा सभापतींनी खुलासा करावा असा सवाल उपस्थित केला आहे .

balasaheb murkute