नेवाशातून मुरकुटेंचा पत्ता होणार कट? दिलीप गांधींसह साहेबराव घाडगेंची भाजपमधून चाचपणी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकींच्या नंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. बऱ्याच विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी चाचपणी देखील सुरु केली आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुनर्वसन करणार असल्याची महिती आहे. मात्र आता नेवासा तालुक्यातील शिक्षणसम्राट साहेबराव घाडगे यांनी देखील राज्यातील एका बड्या नेत्याकडे चाचपणी केल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची खालवत चाललेली प्रतिमा आणि जिल्यातील दोन बड्या प्रस्थांनी तालुक्याच्या राजकारणात घेतलेली एन्ट्री यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेवाशातून मुरकुटेंचा पत्ता कट होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading...

सुरवातीच्या काळात गडाख समर्थक म्हणून त्यांची ओळख होती, परंतु नंतर गडाख यांच्याशी मतभेद झाल्याने ते त्यांच्यापासून दुरावले होते. तर भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशीदेखील त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यानंतरही साहेबराव घाडगे यांनी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक वाढवल्याने घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चादेखील सुरू झाली होती.

बाळासाहेब मुरकुटे आणि शंकरराव गडाख यांच्यातील संघर्ष ऐरणीवर असतानाच दिलीप गांधी यांच्यापाठोपाठ साहेबराव घाडगे यांचे नावदेखील शर्यतीत पुढे येऊ लागल्याने आमदार मुरकुटे यांची चांगलीच राजकीय अडचण होणार आहे. मात्र मुरकुटे यांनी लोकसभा निवडणुकीत विखेंच्या गोटात सामील होत आपल वजन वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी गांधींच्या सक्रीयेतेने मुरकुटेंचा पत्ता कट होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात