Share

Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

Uddhav Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संध्याकाळी पाचच्या सुमारास महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. तसेच, संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत. या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभिवादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे.

शिवतीर्थावरुन एकनाथ शिंदे निघून गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची जागा शुद्ध करण्यासाठी शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

“बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही”, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलंय.

महत्वाच्या बातम्या : 

Uddhav Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संध्याकाळी पाचच्या सुमारास महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now