मतदाना दिवशी बाळा भेगडे आणि पार्थ पवारांची भेट, मावळात चर्चेला उधान

parth pawar and bala bhegde

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे, देशात आणखीन तीन टप्यातील मतदान बाकी असले तरी राज्यातील ४८ मतदारसंघातील मतदान आज पूर्ण होत आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आज मतदान सुरु आहे, मावळमध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला आहे. आज मतदान सुरु असताना पार्थ पवार आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांची मतदान केंद्रावर भेट झाली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र काढलेला फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका लग्न समारंभात आ भेगडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट झाली होती, भेगडे अजित पवारांच्या कानामध्ये काहीतरी सांगत असल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता, यावेळी स्प्ष्टीकरण देताना बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितल्याचं ते म्हणाले होते. तर आज मतदाना दिवशी पार्थ पवार आणि भेगडे यांची भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.

सकाळी११ वाजेपर्यंत मावळमध्ये १८.४ टक्के मतदान

चिंचवड १९.७८ %

पिंपरी १७.८९%

मावळ १७.४८ %

पनवेल १७.१३ %

कर्जत १८.७५ %

उरण १६.९७ %