बाळासाहेबांचे संस्कार जिवंत असल्याने, उद्धव ठाकरे राजच्या बाजूने – सुप्रिया सुळे

टीम महाराष्ट्र देशा:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला समोर जात आहेत .दरम्यान, चौकशीला हजर राहताना राज यांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभीत गोळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दमानिया यांनी म्हटलं होत. दमानियांच्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळेंनीच नाव न घेता उत्तर दिलं आहे.

त्या म्हणाल्या ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावं तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या अशा काळात आपण परिवाराच्या मागे उभे राहतो . त्यामळे राज ठाकरे यांच्या परिवारा सोबत कोणी गेल तर कोणी टिका करू नये. बाळासाहेबाचे संस्कार अजूनही जीवत आहेत यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरे यांची बाजी घेतली असे ही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Loading...

दरम्यान राज ठाकरे यांची कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. याच प्रकरणी राज ठाकरेंची चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोहिनूरप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची दोन दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट