पुणे पदवीधरसाठी बाळराजे पाटलांनी सुरु केली मोर्चेबांधणी

पुणे- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य बाळराजे पाटील हे पुणे  पदवीधर मतदार संघातून इच्छुक असल्याचे समजते आहे.

‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलतांना  बाळराजे पाटील यांनी देखील या वृत्ताला  दुजोरा दिला आहे. मतदारांच्या गाठीभेटी पाटील यांनी सुरु केल्या असून पक्षाने संधी दिल्यास विजय नक्की मिळवेन असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. निवडणूकीला अजून बराच कालावधी शिल्लक असताना इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे पण पक्षांकडून नक्की संधी कोणाला मिळणार हे पाहणं पण महत्वाचं आहे.