एअर स्ट्राईकमध्ये १३० ते १७० दहशतवादी मारले गेल्याचा विदेशी पत्रकाराचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानच्या बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत नवा खुलासा समोर आला आहे. एका परदेशी पत्रकाराने या स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे १३० ते १७० दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी रिपोर्टमध्ये लिहिलेय की, स्थानिक सूत्रांच्या मते शिबिरात साधारण ४५ व्यक्तींवर उपाय सुरू आहे. साधारण २० जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. ते क्षेत्र अद्याप सील करण्यात आले आहे.

Loading...

जसे लष्कराचे दल तेथे पोहोचले तेव्हा जखमींना शिंकारी येथील हरकत-उल-मुजाहिदीन शिबीरात आणण्यात आले आणि पाकिस्तान लष्कराच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जे लोक उपचारानंतर बरे झाले आहेत ते अद्यापही लष्कराच्या ताब्यात आहेत. त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये ११ प्रशिक्षकांचा समावेश होता. यात बॉम्ब बनवण्यापासून ते हत्यारे वापरण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या लोकांचा समावेश होता. यात दोन ट्रेनर अफगाणिस्तानचे होते.Loading…


Loading…

Loading...