Share

Kishori Pednekar। “बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नेमकी विखे पाटलांची की थोरातांची?”; किशोरी पेडणेकर यांचा खोचक सवाल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट तयार झाले आहेत.  शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना, अशा दोन शिवसेना अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात तयार झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका होत आहे. शिंदे गटाला मिळालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून शिवसेना नेत्या आणि मुंबई पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

बाळासाहेब खूप आहेत मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव आहेत. त्यामुळे शिंदे गटाची शिवसेना नेमकी कुठल्या बाळासाहेबांची आहे? विखे पाटीलांची, थोरातांची, शिर्के की निंबाळकरांची, अशी खोचक विचारणा सोशल मीडियात होत असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे.

ठाकरे नाव आल्याशिवाय बाळासाहेब नाव परिपूर्ण होतच नाही. त्यामुळे ती शिवसेना कुणाची, असे उत्तर त्यांना द्यावं लागेल असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल आहे, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जी मशाल आहे. ती धगधगती आहे. नियतीने उत्तर दिल्यावर सगळे स्तब्ध होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जो नतमस्तक होतो त्याने धगधगती मशाल ह्दयात कायम ठेवणार आहेत, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावे आणि चिन्ह पाठवली. त्यात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि चिन्ह ‘मशाल’ हे निवडणूक आयोगाने दिली. मात्र शिवसैनिकांच्या मनाला उभारी देणारी नाव आणि चिन्ह आम्हाला मिळाल्याचं पेडणेकर म्हणाल्या.

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, शिवसैनिक निखारा आहे, तो कधीही पेटला असता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाने ते होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधकांचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जे काम प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट तयार झाले आहेत.  शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना, …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now