पोलीस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासला- बाळा नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा –  – गृहखात्यावर नियंत्रण राहिले नसल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजप जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे.पोलीस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासलाय, गृहमंत्री आर. आर. पाटील असताना अशा घटना घडल्या नाहीत, पोलीस दलातीत विकृती संपविण्यासाठी आमुलाग्र बदल करण्याची गरज असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले . अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट  घेतली