कोटय़वधी रुपयांचे हप्ते बंद झाल्याने अधिकाऱ्यांचा मनसेवर राग – नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा: उच्च नायायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी फेरीवाल्यां विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच फेरीवाल्यांकडून मिळणारे कोटय़वधी रुपयांचे हप्ते बंद झाल्याने अधिकारी मनसेवर राग काढत असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केलं जात आहे. आंदोलना दरम्यान गुन्हे दाखल करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना चॅप्टर केसेसनुसार २५ लाख ते एक कोटी रुपयांचे जामीन मागण्यात आले आहेत. हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार होत असून. पोलिसांची मनमानी कारवाई सुरू असल्याचा आरोपही नांदगावकर यांनी केला आहे .

.

 

You might also like
Comments
Loading...