मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बऱ्याच वेळ चर्चा देखील झाली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे यांची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना युती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी एक सूचक विधान केले आहे.
“महाराष्ट्रातीळ सध्याची परिस्थिती पाहिली तर मनसेसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. इतर सगळ्या पक्षांविषयी लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत सकारात्मक आहे. त्यामुळेच आमचा ‘एकला चलो रे’चा नारा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे,” असे नांदगावकर यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Supriya Sule | “राज्यात कोणीही कोणत्याही पक्षात फिरत आहे, त्यामुळे…”; सुप्रिया सुळेंचा दीपक केसरकरांना टोला
- Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- Kapil Dev on Virat Kohli : कपिल देव यांच पुन्हा एकदा विराटबद्दल मोठं वक्तव्य; यावेळी ते काय म्हणाले? वाचा!
- Ajit Pawar | “आताच यांची माईक ओढाओढी चालू आहे…”; अजित पवारांची खोचक टीका
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<