Bala Nandgaonkar । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दररोज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांसमोर येत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.
नांदगावकर म्हणाले कि, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारण एक ते सव्वा तास चर्चा झाली. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही युतीची सुरुवात आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, फडणवीस आणि राज ठाकरेंची मैत्री पूर्वीपासूनची आहे. मध्यल्या काळात भाजपला सत्ता स्थापनेसाठी जी काही मदत लागली आहे ती मनसेकडून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे, असं नांदगावकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले कि, असे करण्यामागे राज्यात जी काही अस्थिरता होती ती स्थीर व्हावी यासाठी ही मदत होती. मदत करण्यामागे मैत्री ही एकच भूमिका होती. याचा अर्थ आमचा सरकारमध्ये समावेश असलाच पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच आम्ही तशा प्रकारे मागणी देखील केलेली नाही. तसेच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मनसे युती होऊ शकते का यावर त्यांनी आता बोलणे उचित ठरणार नाही, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule : मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते, त्यांच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र – सुप्रिया सुळे
- Bala Nandgaonkar : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IND vs ENG : “विराटबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे”, इंग्लंडच्या कर्णधारानं घेतली कोहलीची बाजू
- Supriya Sule : “एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असणारा…”; राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची टीका
- Sanjay Raut | “आता औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा काय झाला”; संजय राऊत यांचा घणाघात
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<