MNS: माझं कुळ आणि मूळ तेच- बाळा नांदगावकर

पुणे: मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर झाला तर आनंदच होईल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हंटले आहे.  त्यांनी पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. त्यात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
बाळा नांदगावकर पुढे म्हणाले, ‘शिवाजी महाराज, शाहू- फुले -आंबेडकर यांच्या विचारांना पुढेघेऊन जाणारी व्यक्ती मुंबईचा महापौर झाला पाहिजे. नागरिकांच्या हिताचे निर्णय त्याने घेतले पाहिजेत. अशी अपेक्षा बोलून दाखवली.
पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र करण्यासाठी ओळखला जातो. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही इथे गप्पा रंगल्या होत्या.महापालिका मतमोजणीच्या आदल्या दिवशी या कट्ट्यावर सर्वपक्षीय नेते गप्पांसाठी जमले होते. त्यावेळी भाजप खासदार संजय काकडे यांनी अचूक अंदाज वर्तवल्यामुळे, वाडेश्वर कट्ट्याकडून त्यांना 4 हजार रुपयांचं बक्षीसही दिलं होतं.