मावळ : बाळा भेगडेंच्या प्रयत्नातून शेलारवाडी व आसपासच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटणार

टीम महाराष्ट्र देशा:- शेलारवाडी येथे जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून नव्याने जोडण्यात येणाऱ्या 38 लक्ष रुपयांच्या पाणी योजनेचा भूमिपूजन शुभारंभ राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

शंकर वाडी हा भाग स्वातंत्र्यनंतरही देहूरोड कॅन्टोन्मेंट,सोमाटने ग्रामपंचायत व तळेगांव दाभाडे नगरपरिषद असेल ह्या मध्ये समाविष्ट नसल्यामुळे शंकर वाडी व टोलनाका परिसरातील नागरिकांच्या पाण्याची अंत्यत गैरसोय होत होती. सर्व नागरिकांना न्याय देण्याचा भूमिकेतून राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठ पुरावा करून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 38 लक्ष रुपये शंकरवाडी व टोल नाका परिसरातील पाणी योजनेकरीता मंजूर करून घेऊन आज या पाणी योजनेच्या भूमिपूजन शुभारंभ करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून, राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आगामी काळात सर्व नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही यावेळी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, कैलास पानसरे ,बाळासाहेब शेलार, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार ,नगरसेवक विशाल खंडेलवाल, राहुल बालघरे,सारिकाताई नाईकनवरे, अरुणाताई पिंजण,अशोक मामा शेलार,गोपाळ शेलार,लहूमामा शेलार,गजानन शेलार,उद्धव शेलार,पाणी पुरवठा अधिकारी,सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.