वंदन तुज लोकमान्य भास्कर टिळका

बाळ गंगाधर टिळक (जन्म 23 जुलै इ.स. 1856) टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते.  त्यांच्या कर्तृत्वाने आणि विद्वत्तेने ते लोकमान्य ठरले.
भारताचा स्वातंत्र्य लढा आठवताक्षणी डोळ्या समोर येणार नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच होते.  कारण एकाच व्यक्तीमत्वामध्ये सगळेच गुण पराकोटीच्या उच्च स्वरूपामध्ये असणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे टिळक.
टिळकांचं संपूर्ण आयुष्यचं आदर्शमय होत.  त्यांच्या जीवनाकडे बघत असताना अनेक प्रकारे स्फूर्ती देशप्रेमाची, स्वाभिमानाची,स्वकर्तृत्वावर काहितरी करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या सतत मिळत असते.  मी माझ्या जीवनात  जी जी कृती करेल ती फक्त माझ्या समाजहितासाठी व देशहितासाठी असेल. लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील धगधगते ज्वालामुखीचं होते.  ज्यांचं अस्तित्व बलाढ्य अश्या असणाऱ्या इंग्रजांचाही थरकाप उडवत होत.देशासाठी जन्म घ्यावा, प्रत्येक श्वास हा देशासाठी घालावा आणि देशाचं चिंतन करत, शेवटचा श्वास घेत या संपूर्ण जगाला निरोप द्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
टिळकांनी श्रीमदभगवद्गीतेच चिंतन करून त्यातील नवनीत गीता रहस्याच्या रूपाने आपल्याला उलघडून दिलेलं आहे.  वडिलांच्या अखेरच्या समयी त्यांना गीता ऐकवीत असताना टिळक या विषयाकडे ओढले गेले. पुढे स्वतंत्रपणे इतर मतमतांतरे आणि टीकांचा गलबला बाजूला सारून गीतेचा अभ्यास केला.  अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, गीता ही निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे.  असा त्यांचा दृढ विश्वास तयार झाला आणि त्याच फळ म्हणजे श्रीमद्भगवद्गीतारहस्य हे झालं. अस हे टिळकांचं व्यक्तिमत्व हे गुरुतुल्य होतं.
स्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारचं.या लोकमान्यांच्या वाक्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्वाळा उफाळून आली.  जी भारतीय माणसे इंग्रजांनाच आपलं सर्वस्व मानूलागली होती ती माणसे सुद्धा टिळकांनी आपल्या लेखणीतून,आपल्या वक्तृत्वातून जागी केली आणि सांगितलं बाबांनो हा देश आपला आहे, हा कुणाच्या बापाचा नाहीये.  या इंग्रजांनी या आपल्या मातृभूमीवर कब्जा करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्या या मातृभूमीला जर स्वतंत्र करायचं असेल तर या इंग्रजांना या देशातून हाकलले पाहिजे.  या अशा प्रखर लेखणी मधून, भाषणांमधून  या भारतीयांना जाग करण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे.
टिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हाती घेतलेली मशाल स्वतः पुरतीच मर्यादित न ठेवता त्याच्याद्वारे अनेक कार्यकर्त्यांना इंग्रजांविरुद्ध पेटविण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हंटले आहे.
टिळकांनी चार भिंतींमध्ये साजरा होणारा गणेश उत्सव हा चौकात आणला. त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. आणि याचा परिणाम असा झाला की सगळा हिंदू समाज एकत्र व्हायला लागला मग वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्याने व्हायला लागली या व्याख्यानांमधून समाजाला जाग करण्याचं काम सुरू झालं. अस या गणेशोत्सवाचं स्वरूप टिळकांनी आणलं. आजचा गणेशोत्सव जर टिळक वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही.  आता तर टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीतचं म्हणे!  महाराष्ट्राच दुर्देव आहे की असं बोलणारी माणसे या राज्यात जन्माला आली. असो…
टिळकांच्या  जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्यावर विचार करून, त्यांच स्मरण करून आपण कृतज्ञता व्यक्त करू  आणि या युगपुरुषाच्या चरणी अभिवादन करू…!!

– कृष्णा नंदकुमार रामदासी (बीड)