‘बकुळा नामदेव..’चित्रपटास चौदा वर्ष पूर्ण; एक सीन शेअर करून भावना व्यक्त

sonali

मुंबई : प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात ज्याची जागा निर्माण करणारा चित्रपट म्हणजे ‘बकुळा नामदेव घोटाळे.’ मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र येऊन आगळा वेगळा प्रयोग केला, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाला मंगळवारी (१२ ऑक्टोबर) रोजी १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त या चित्रपटातील काही कलाकारांनी या चित्रपटातील एक सीन शेअर करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने चित्रपटातील एक व्हिडिओ  शेअर करून लिहिले आहे की, आज ‘बकुळा नामदेव घोटाळे’ प्रदर्शित होऊन १४ वर्षे झाली. सिद्धार्थ जाधवने देखील हाच व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, ‘बकुळा नामदेव घोटाळे. आज नाम्या १४ वर्षाचा झाला. छोटी-मोठी कामं करता करता, मुख्य भूमिका मिळालेलं पहिलं काम, श्रेय अर्थात केदार शिंदे सरांनाच. सिध्दार्थ आणि सोनाली बरोबर जोडीची चांगलीच लोकप्रिय ठरली. यासोबत भरत जाधवने देखील सोनाली कुलकर्णीसोबत या चित्रपटातील एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, ‘अमाप प्रेम आणि आनंद दिला या पात्राने’.

हा चित्रपट अत्यंत मनोरंजनात्मक असून दिग्दर्शक केदार शिंदे हे आहेत. सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, विजय चव्हाण, कुशल बद्रिके, रेशीम टिपणीस यांसारख्या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट १२ ऑक्टोबर, २००७ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील दिग्गज कलाकार एकत्र येऊन कलाकारांनी ‘एक सीन’ शेअर करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यास प्रेक्षकांनी तसेच नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटस् करत शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या