शरद पवारांकडे जर एल्गार परिषदेबाबत काही दस्ताऐवज असतील तर ते खोटे आहेत

Prakash Ambedkar

पुणे : एल्गार परिषदेच्या प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, त्याचबरोबर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

त्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.

पहा व्हिडिओ :

शरद पवारांकडे जर एल्गार परिषदेबाबत काही दस्ताऐवज असतील तर ते खोटे आहेत

शरद पवारांकडे जर एल्गार परिषदेबाबत काही दस्ताऐवज असतील तर ते खोटे आहेत#PrakashAmbedkar #SharadPawar #ElgarParishad

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Tuesday, September 15, 2020

महत्वाच्या बातम्या :