घ्या आता , बजरंग बप्पांना विजयाचा पक्का कॉन्फिडन्स निकालाआधीच काढणार आभार दौरा

बीड : नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या मतदानरुपी भरभरून प्रेमापोटी मायबाप जनतेचे जाहीर आभार मानण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आय,स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप,रिपाई कवाडे गट,व मित्रपक्षाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांचा बीड जिल्ह्यात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निकलापूर्वीच आभार दौरा काढण्याचं नियोजन केलं आहे. दम्यान, जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती पाहता दौऱ्यात शाल श्रीफळ हार यांनी सत्कार करू नये असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे हा बजरंग सोनावणे यांचा विजयाचा ओव्हर कॉन्फिडन्स असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बीड लोकसभा मतदार संघातील लढत ही भाजपच्या प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या होत आहे. ही लढत सुरवातीला भाजपला जणू एकतर्फीच वाटू लागली. ‘कोण होणार बळीचा बकरा’ अशा पोस्ट भाजप समर्थक फिरवू लागले. पण, ऐनवेळी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आणि निवडणुकीचा नुरच पलटला. राष्ट्रवादी समर्थकांनी ‘शेतकरीपुत्र’ ही टॅगलाईन वापरून निवडणुकीत चांगलीच रंगत आणली असून मुंडे भगिनींना एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चांगलीच चुरशी झाली आहे.

मात्र, आता निकालापूर्वी बजरंग सोनावणे यांनी मतदार संघात आभार दौऱ्याचे नियेाजन केले आहे. शनिवार पासून आठ दिवसांच्या आभार दौऱ्यात बजरंग सोनवणे पाटोदा, आष्टी, बीड, केज, शिरुर कासार, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, वडवणी आणि अंबाजोगाई या लोकसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यांतील काही गावांत भेटी देऊन मतदारांचे आभार मानणार आहेत. मतदानानंतर आणि निकालापूर्वी बजरंग सोनवणे हे आभार दौरा काढून हा नवा पायंडा पाडत असून देशातील असा आभार दौरा काढणारे कदाचित बजरंग सोनावणे हे पहिलेच उमेदवार असावेत.