कोणीही सोडून जाउद्या आम्हा कार्यकर्त्यांना बिलकूल चिंता नाही, बीड जिल्ह्यात घड्याळाचा गजर होणारच

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या पक्षांतराची लाट आली आहे. विरोधी पक्षातले विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, खासदार व आमदार यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. बहुतेक आमदार स्वत:हून सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. तर, काहींना फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्याच्या बिकट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरणार आहेत. शरद पवार पुढील आठवड्यापासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी ते मतदारांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अशातच बीड लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार बजरंग सोनावणे यांनी कोणीही सोडून जाउद्या आम्हा कार्यकर्त्यांना बिलकूल चिंता नाही, बीड जिल्ह्यात घड्याळाचा गजर होणारच. असा विश्वास व्यक्त केला आहे.  सध्या राज्यातील काही जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून राज्यहितविरोधी पक्षात प्रवेश करत आहेत, त्याची आम्हा कार्यकर्त्यांना बिलकूल चिंता नाही. बीड जिल्ह्यात घड्याळाचा गजर होत राहील याची खात्री आम्हाला आहे. अस बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.

आगामी विधानसभा संदर्भात मा. शरद पवार साहेब मंगळवारी बीड जिल्ह्यात येत आहेत व बुधवारी सकाळी ११ वाजता पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. तरी बीड राष्ट्रवादी च्या सर्व कार्यकर्त्यांनी येत्या बुधवारी बीड येथे उपस्थित राहावे. अस आवाहन देखील बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या