जकार्ता : चाहत्यांनीही केला ‘वंदे मातरम’ चा जयघोष, बजरंगने मारली बाजी

टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा प्रेक्षक खेळाडूंना प्रोत्साहन देतात तेव्हा त्याची कामगिरी उल्लेखनीय अशीच होते. जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाच्या बाबतीत खेळ सुरु असताना आज हाच प्रकार पहायला मिळाला.

बजरंगचा उपांत्य फेरीचा सामना सुरु होता. त्यावेळी तेथे भारताचे चाहते उपस्थित होते. आणि  भारतीय चाहत्यांनी ‘वंदे मातरम’ अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. हा जयघोष सुरु होत असताना बजरंगची कामगिरी सुधारत गेली. त्यावेळी भारतीय प्रशिक्षकांनीही चाहत्यांना घोषणा जोरात देण्यासाठी सांगितले. चाहत्यांनीही जोरात जयघोष सुरु केला. त्यावेळीच बजरंगने बाजी मारली आणि त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ऑल्टमन्स यांची हकालपट्टी

एशियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस स्पर्धेत भारताला ब्रॉंज पदक