‘व्हॅलेंटाइन डे’ विरोधात बजरंग दलकडून ‘इशारा रॅली’

bajarag dal nagpur

नागपूर: बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ ला विरोध म्हणून देशभर निदर्शने केले आहेत. व्हॅलेंटाइन डे ला बजरंग दल कडून दरवर्षी विरोध करण्यात येतो. नागपूर मध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला.

Loading...

बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ विरोधात ‘इशारा रॅली’ काढली. तसेच रस्त्यात एखादे जोडपे भटकताना सापडले तर आम्ही त्यांचे लग्न लावून देऊ, त्यासाठी पंडीतही तयार ठेवले आहेत. अशी धमकीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली. या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या एक दिवस आधी या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून उद्या पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. तसेच देशात अहमदाबाद, हैदराबाद, तामिळनाडू आणि चेन्नई येथे ‘व्हॅलेंटाइन डे’ ला बजरंग दल कडून विरोध करण्यात आला.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...