कानपूर: जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला बजरंग दलाकडून चोप दिल्याची घटना कानपूर येथे घडली आहे. या व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. कानपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदू महिलेला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. या व्यक्तीला रस्त्यावर मारहाण करत ‘जय श्री राम’ चा जयघोष करण्यास प्रवृत्त केल्याचे बोलले जात आहे.
सदरील घटना बुधवारी कानपूरच्या वरुण विहार परिसरात घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, तेव्हा ही घटना उघडकीस आली.यामध्ये अल्पवयीन मुलगा रडत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी तो आरडाओरड करताना दिसून येत आहे. नंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार कानपूर येथील महिलेने १२ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले आहे की,सदरील व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होते. पीडित महिलेने याविरोधात पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली पण कोणतीही कारवाई झाली नाही.
‘ते मला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावत आहेत आणि मला २० हजार रुपयांची ऑफरही देण्यात आली. मी त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार केली पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेवटी मी बजरंग दलाशी संपर्क साधला. असे पीडित महिलेने सांगितले आहे. यादरम्यान बजरंग दलचे कार्यकर्ते यांनी याठिकाणी येऊन धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली.
या घटनेनंतर राहुल, अमन आणि राजेशला अटक करण्यात आली आहे. आणि पुढील तपास सुरू असल्याचे कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. अनिल कुमार यांनी गुरुवारी रात्री निवेदनात म्हटले आहे. बजरंग दलाचे जिल्हा संघटक दिलीप सिंह यांनी मान्य केले की, त्यांच्या संघटनेने कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही पोलिसांकडे धार्मिक धर्मांतराची तक्रार दाखल केली पण त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आम्ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट