संभाजी ब्रिगेडच्या शरद पोखरकरांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

Bajrang Dal activists attacked Sambhaji Brigade's Sharad Pokhkar

मंचर: संभाजी ब्रिगेड तसेच मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक शरद पोखरकर यांच्यावर खुनी हल्लाची घटना घडली आहे. पोखरकर यांच्या घरात घुसून जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. तर त्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या अन्य दोन कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे सर्व लोक हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.

पोखरकर हे मंचर येथे डोबी मळ्यामध्ये राहतात. शिवजयंती कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात चर्चा करायची असल्याचे सांगून बजरंग दलाचे कार्यकर्ते पोखरकर यांच्या घरी आले, यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. तर कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे मोफत वाटप पोखरकर व त्यांचे सहकारी करतात. ‘हि पुस्तके का वाटता’ या कारणावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोखरकर यांना मारहाण केल्याचे पोलीस तक्रारीमध्ये सांगण्यात आल आहे .

दरम्यान या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात बजरंग दलाचा कार्यकर्ता रोहित ढुमणे, स्वप्नील अशोक शिंदे, संजय भास्कर शिंदे, स्वप्नील कुशाबा भोर, (सर्व रा. अवसरी खुर्द-भोरवाडी, तालुका आंबेगाव) यांच्यासह पन्नास कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वैभव दत्तात्रय शिंदे व प्रकाश किसन शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे.

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनाही सादर घटनेची माहिती दिली आहे. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन हक यांनी दिले असल्याच बांगर यांनी सांगितले. बांगर म्हणाले, ‘तीन दिवसांपूर्वी पोखरकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र आले होते. शनिवारी (ता. १७) पोखरकर यांनी मंचर पोलिस ठाण्यात पत्राबाबत फिर्याद दाखल केली आहे. हा पूर्व नियोजित कट आहे.’