बीड लोकसभा : बजरंग सोनावणे यांनी भरला उमेदवारी अर्ज

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थित असून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रीतम मुंडे या बीडमधून विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. यावेळी बजरंग सोनावणे आणि प्रीतम मुंडे याच्यातील लढत रंगतदार ठरणार आहे. तरी देखील प्रीतम मुंडे यांच पारड चांगलच जड आहे. त्यामुळे बजरंग सोनावणे यांच्यासाठी ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान विद्यामान खासदार डाॅ.प्रीतम मुंडे या देखील आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे व लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी आई प्रज्ञाताई मुंडे, अमित पालवे, बहीण यशश्री मुंडे सह आमदार.आर.टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

2 Comments

Click here to post a comment