fbpx

बजरंगाची कमाल : तबलिसी ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत पटकावले सुवर्ण

टीम महाराष्ट्र देशा: जॉर्जिया इथं सुरु झालेल्या तबलिसी ग्रां प्री कुस्ती स्पर्धेच्या पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात भारताच्या बजरंग पुनियानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानी याला हरवलं. बजरंगचं या हंगामातलं हे चौथं सुवर्णपदक असून गेल्या वर्षीही त्यानं या स्पर्धेचं सुवर्ण पदक पटकावलं होतं.

त्याचबरोबर भारताच्या विनेश फोगट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथे झालेल्या स्पर्धेत बजरंगने गेल्या वर्षीही सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे या वर्षी बजरंग सुवर्णयश राखणार का, याबाबत उत्सुकता होती. बजरंगचे हे या मोसमातील चौथे सुवर्णपदक ठरले आहे.