Bajaj- बजाज पल्सर एनएस 160 मॉडेल सादर

विशेष करून तरूण वर्गाला समोर ठेवत बजाजने पल्सर एनएस 160 हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. याचे एक्स-शोरूम मुल्य 80,648 रूपये इतके आहे. नवीन मॉडेलमध्ये शक्ती, कार्यक्षमता आणि स्टाईलचा मिलाफ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ही बाईक आधीच्या पल्सर एएस 50 या मॉडेलच्या फ्रेमवर्कवर आधारित असून यात एनएस 200 या मॉडेलची स्टाईल वापरण्यात आली आहे.

 

सफायर ब्ल्यू, पॅशन रेड आणि ग्लॉसी ग्रे या 3 आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना ही बाईक उपलब्ध करण्यात आली आहे. बजाज पल्सर एनएस 160 या मॉडेलमध्ये 160.30 सीसी क्षमतेचे सिंगल सिलींडर डीटीएस-आय इंजिन प्रदान करण्यात आले आहे. याला 5 गिअर्स अटॅच करण्यात आले आहेत. इलेक्ट्रीक स्टार्टची सुविधा असणार्‍या या मॉडेलमध्ये डिजीटल स्पीडोमीटर व फ्युअल गॉज प्रदान करण्यात आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून बजाजच्या पल्सर एनएस १६० बाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे मॉडेल कंपनीने अधिकृतपणे बाजारपेठेत उतारले आहे.

You might also like
Comments
Loading...